Monday 1 September 2014

कर वाचविण्यासाठी हिंदू अविभक्त कुटुंब


प्रत्येक व्यक्तीला  त्याच्या टॅक्स वाचविण्यामध्ये  स्वारस्य आहे. इन्कम टॅक्स कायद्याच्या  विविध तरतुदींच्या फायदा घेऊन कर बचत शक्य आहे.


अनेक करदाते  इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करतांना आढळतात. तथापि, इन्कम टॅक्स बचत कायदेशीर मार्गाने शक्य आहे.


इन्कम टॅक्स बचतीच्या अशा अनेक मार्गांमध्ये एक महत्वाचा मार्ग आहे हिंदू अविभक्त कुटुंब (Hindu Undivided Family/ HUF). इथे  याची नोंद करावी कि हिंदू अविभक्त कुटुंब हि इन्कम टॅक्स कायद्याच्या दृष्टीने संपूर्णतः वेगळी व्यक्ती आहे. समजा तुमच्या कुटुंबात पती आणि पत्नी आणि दोन सज्ञान किंवा अज्ञान मुले असतील तर ज्या प्रमाणे त्या प्रत्येकाचे वेगळे PAN असेल त्याचप्रमाणे तुमच्या हिंदू अविभक्त कुटुंबाचे सुद्धा वेगळे PAN काढावे लागेल.

बर्याच वेळेस कलम 80 सी ने दिलेल्या वजावाटीचा पूर्णतः उपयोग केला जातो. अशावेळी हिंदू अविभक्त कुटुंब  80 सी चा लाभ घेण्यासाठी एक अनोखा आणि नवीन पर्याय उपलब्ध करून देतो.  हिंदू अविभक्त कुटुंबाला स्वताचे स्वतंत्र अस्तित्व असल्याने इन्कम टॅक्स कायद्याच्या इतर तरतुदी सुद्धा लागू पडतात. या तरतुदी त्याला एका व्यक्ती ला असल्याप्रमाणे लागू पडत असल्याने हिंदू अविभक्त कुटुंबाला  ०%, १०%, २०% आणि ३०% या प्रमाणे कर लागू होतो. म्हणजेच तुम्ही जर कर ३०% दराने भरत असाल तर तुम्ही हिंदू अविभक्त कुटुंबाचा  उपयोग करून कायदेशीर रित्या मुबलक कर वाचवू शकता.

CA Anand Mutha
anandmutha@armutha.in

New Tax Regime or Old – What should you choose?

The budget 2020 saw the finance minister Nirmala Sitraman announce a new tax regime with more tax slabs and lower tax rates. This was long...